२००९ वर्षाचा शेवटच दिवस......................... ३१ डिसेंबर २००९ ला ४ वाजता ऑफिस मध्ये असताना मला माझ्या बहिणीचा (मोहिनी) फोन आला आणि ती म्हणाली "तन्मयला (माझा भाचा) ICU मध्ये दाखल केले, त्याला कफ झाला आणि तो घरी काही मेडीसीन घेत नाही, म्हणून दवाखान्यात दाखल केले आहे, काळजी करायची काही कारण नाही, तू उद्या सकाळी श्रीरामपूरला ये.", मग मी म्हणालो कि मी सकाळी ४ वाजता निघतो आणि श्रीरामपूरला येतो. मग ३१ च्या रात्री जरा लवकरच झोपलो (९ वाजता), आणि सकाळचा ४ चा गजर लावला होता.
२०१० नववर्षाची सुरुवात............................
१ जानेवारी २०१० सकाळी ४ वाजता गजर वाजला आणि मी उठलो सगळी तयारी केली, आणि ५ वाजता निघालो, मला शिवाजीनगर स्टेशन वरून गाडी मिळाली थेट श्रीरामपूर, १० वाजता श्रीरामपूरला पोहोचलो, पंत घ्यायला आले होते, ते मला हॉस्पिटल ला घेऊन गेले.........
इस्पितळात एकदम ICU मध्ये गेलो आणि भाच्याला बघितले खूप खोकला चालू होता आणि छाती कफाने भरली होती.
ICU मध्ये एकूण ३ बेड होते, एकावर तनु, एक बेड रिकामे होते, आणि एका बेड वर आजून एक मुलगा होता तो तनु पेक्षा सहा महिन्यांनी मोठा म्हणजे साडेतीन वर्षाचा होता. मग जरा तासभर गेल्यावर मी जरा तेथे बसलो, आणि सहज त्या दुसऱ्या मुलाच्या आईला विचारले कि काय झाले, तेव्हा त्या म्हणाल्या "छातीत पाणी आणि पु झाला आहे, आणि मुलाला खूप त्रास होत आहे". मग मोहिनीनि ने मला जरा सविस्तर सांगितले कि "तो मुलगा मागच्या ४ दिवसांपासून ICU मध्ये आहे, आणि त्याचे एकदा छातीतून पाणी काढून झाले बिना भूल देता, आणि त्या मुलाला खूप त्रास होत आहे, त्याची प्रकृती खूप खालावली आहे, तो उभा पण राहू शकत नव्हता, आणि मुख्य म्हणजे तो जेवण करत नाही, डॉक्टर नुसते सलाईन वर सलाईन देताय".
आजून माहिती मिळाल्यावर असे कळले कि डॉक्टर सुद्धा आले नव्हते, त्या कुटुंबाची आर्थिक परिस्तिथी जरा नाजूकच होती, त्या मुलाची आई तर सारखी रडत होती (एकुलता एक मुलगा होता), तेव्हा मला त्या मुलाचे हाल बघवत नव्हते, मग मी त्या मुलाचा आई आणि वडिलांना जरा डॉक्टरांना सविस्तर विचारायला लावले,मुख्य डॉक्टर तर नव्हते, फोन करून विचारले तेव्हा त्यांना आजून २ छातीचे फोटो( X RAY) काढायला सांगितले. त्यांनी डॉक्टरांनी सागीतल्या प्रमाणे केले. डॉक्टर २ वाजता आले आणि त्यांनी त्या मुलाला आणि X RAY तपासले आणि ३ वाजता अंत्यंत निवांतपने सांगितले कि "आम्हाला काही कळत नाहीये कि नेमक छातीत पाणी कुठे आहे, तुम्ही याला मोठ्या दवाखान्यात घेऊन जा". असे म्हणून ते निघून गेले. ते सगळे एकूण एकदम रडारड चालू झाली, मग मी आणि मोहिनी ने त्यांना जरा शांत केले आणि लवकरात लवकर मोठ्या दवाखान्यात घेऊन जाण्यास सागितले, तरी त्या मुलाची आई रडत आणि म्हणत होती कि, "या डॉक्टरांनी आम्हाला आधीच का नाही सांगितले?, गुण तर पडला नाहीच आजून त्रास वाढला, ८००० रुपये बिल झाले, आमच्याकडे काय एवढे पैसे आहे का?" आणि परत रडणे सुरु..............
मग त्यांनी निघायची तयारी केली आणि मला आणि पंताना राहवले गेले नाही आम्ही त्यांना काही रुपये दिले त्या मुलाच्या खर्चासाठी, मग त्यांनी आमचा फोन क्रमांक घेतला आणि ते तातडीने औरंगाबाद ला गेले..........
४ वाजता तनु ची सलाईन संपली होती, मग आम्ही त्याला घेऊन जरा फिरून आणले आणि चहा घेतला आणि बसलो असताना ICU मध्ये आजून एक मुलगा आला होता, ५ वर्षाचा होता आणि त्याची बौद्धिक वाढ झाली नव्हती, त्याला फिट आले होते आणि तो बेशुद्ध होता.त्या मुलाला भूल देऊन झोपवले होते आणि ऑक्सिजन लावला होता, त्याच्या छातीचे ठोके, BP टीवी वर मोजत होते. त्याची आई त्याच्या जवळ बसली होती. काही वेळाने त्याचे आजी,काका,काकू सगळे आले. ते कुटुंब सोनार होते आणि त्याचे ३-४ सोन्याचे दुकाने होती, म्हणजे कुटुंबाची आर्थिक परिस्तिथी मजबूत होती.
संध्याकाळचे ७ वाजले होते आम्ही ICU बाहेर बसलो होतो आणि अचानक ICU मध्ये खूप आवाज येऊ लागला, बघितले तर नवीन आलेल्या मुलाचे वडील त्याच्या आईला मारत होते, नंतर त्या सगळ्यांना डॉक्टरांनी बाहेर काढले, मग बाहेर भांडण चालू झाले, त्या मुलाच्या आईने अंगावरचे सगळे दागिने काढून फेकले (सासूबाईने ते लगेच उचलले) आणि म्हणत होती कि "मरु द्या त्याला, मला त्याचा कंटाळाच आला आहे", मग काही वेळाने भांडण मिटले, आणि डॉक्टरांनी फक्त मुलाच्या आईला मुलापाशी थांबवले आणि सगळ्यांना दवाखान्या बाहेर काढले व गेट ला कुलूप लावले.
हा प्रकार पाहून डोके अगदी सुन्न झाले, आणि मनात विचार आला कि एक कुटुंब ज्याची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा मुलाला बरे करण्यासाठी किती प्रयत्न करत होते आणि दुसरे कुटुंब आतिशय श्रीमंत पण घरात एकमेकांचे पटत नाही आणि त्याचा त्रास मुलांना होतो.
१,२,३ जानेवारीपर्यंत मी दवाखान्यातच होतो, ३ जान ला मी २ वाजता पुण्याला निघालो, सायंकाळी ७:३० ला PMT मधून घरी जात असताना मला एक फोन आला आणि तिकडून आवाज आला कि "मी औरंगाबाद वरून ******* बोलतोय, आता माझ्या मुलाला बरे वाटत आहे, त्याने जेवण केले आणि तो आता खेळायला पण लागला आहे. त्या दिवशी (१ जानेवारीला) रात्री ११ वाजता डॉक्टरांनी त्याच्या छातीतून पाणी काढले. मी बरे केले कि त्याला मोठ्या दवाखान्यात नेले."
हे ऐकून खूप बरे वाटले आणि माझ्या नववर्षाची सुरुवार अतिशय चांगली झाली त्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानले, ४ तारखेला तनुला सुद्धा घरी सोडण्यात आले..........................